Ad will apear here
Next
रत्नागिरीत विठूमाऊलीची नगरप्रदक्षिणा उत्साहात
नगर प्रदक्षिणेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावरून पेठकिल्ल्याकडे निघालेली विठूरायाची पालखी आणि सहभागी झालेले भाविक. (फोटो : पराग हेळेकर, रत्नागिरी)

रत्नागिरी :
कार्तिकी एकादशीला रात्री १२ वाजता नगरप्रदक्षिणा केल्यानंतर रत्नागिरीतील विठोबाच्या पालखीची नगरप्रदक्षिणा प्रथेप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला (२१ नोव्हेंबर २०१८) पुन्हा एकदा पार पडली. पालखी दुपारी १२ वाजता बाहेर पडली आणि विठूनामाचा गजर करत, ढोल-ताशांच्या गजरात ही पालखी रात्री उशिरा पुन्हा विठ्ठल मंदिरात परतली.

चातुर्मास व कार्तिकी एकादशीनंतरच्या या नगरप्रदक्षिणेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पांडुरंग भाविकांची ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी ही प्रदक्षिणा करतो, अशी लोकभावना आहे. जुन्या रत्नागिरीच्या सर्व हद्दींवरून काढल्या जाणाऱ्या या प्रदक्षिणेत हजारो भाविक सहभागी झाले. अठरापगड जातींना एकत्र आणून ही प्रदक्षिणा पारंपरिक पद्धतीने काढली जाते.

पालखी गोखले नाका, राधाकृष्ण नाक्यामार्गे धनजी नाका, गवळीवाडा, जेल रोडने गोगटे कॉलेजवरून कोर्टासमोरून विश्वेश्वराच्या घाटीने विश्वेश्वर मंदिरात पोहोचली. तिथून ती राजिवडा, तेली आळी तळ्याजवळून खडपे वठार, चवंडे वठार रस्त्याने मांडवी नाक्यात आली. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरावरून पालखी नाईक फॅक्टरीपर्यंत पोहोचली. तिथून रस्ता सोडून पालखी लगतच्या रस्त्याने समुद्रावर आली. त्यानंतर पालखीतील विठ्ठलाला समुद्रस्नान घालण्यात आले. माऊलींच्या निरास्नानासारखी ही परंपरा रत्नागिरीकर शेकडो वर्षे जोपासत आहेत. या वेळी बबनशेठ मलुष्टे, पराग हेळेकर, स्वप्नील  पांचाळ, मंदार  व केदार मयेकर, पराग  तोडणकर, केदार मलुष्टे, प्रवीण हेळेकर, गौरव  हेळेकर आदी उपस्थित होते.

त्यानंतर पेठकिल्ल्यात श्री सांब मंदिर, नाक्यातील राम मंदिरावरून पालखी मुरुगवाड्यातून आली. मिऱ्या बंदराच्या चौकातून पांढऱ्या समुद्राच्या पुळणीजवळच्या रस्त्याने पालखी पिलणकर भोळे मंडळींच्या वाडीत शिरली. तिथून रेमंडच्या जवळील शेतातून परटवणे नाक्यात येऊन पालखी भार्गवराम मंदिराकडे पोहोचली.
नर्मदा हायवेच्या खालच्या बाजूने डोंगर उतारावरच्या पायवाटेने पालखीने आंब्याच्या बागेतून छोट्या छोट्या दिव्यांच्या प्रकाशात सावंतनगर, खालच्या फगरवठारकडे वाटचाल केली. चढउतारातून, परटवणे नदीतून, काट्याकुट्यातून वाट काढत पालखी वरच्या फगरवठारात आली. तिथे पांडुरंगाचा जयजयकार झाला. तिथून पालखी डीएसपी बंगल्याला लागून उताराने चावडीवरून धनजी नाक्यात आली. तिथे भजन करून पालखी पुन्हा राधाकृष्ण नाक्यामार्गे मंदिरात आली आणि नगरप्रदक्षिणेची सांगता झाली.

(रत्नागिरीतील विठोबाच्या नगरप्रदक्षिणेच्या या परंपरेबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZPGBU
Similar Posts
पांडुरंगाची नगरप्रदक्षिणा कार्तिकी एकादशीनंतरच्या चतुर्दशीला म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला रत्नागिरीत विठूरायाची नगरप्रदक्षिणा होते. यंदा ती २१ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. आपल्या जाणत्या पूर्वजांनी दैवताच्या आधाराने जोपासलेलं सोशल इंजिनीअरिंग जाणून घेण्यासाठी, जुन्या रत्नागिरीची हद्द समजून घेण्यासाठी ही नगरप्रदक्षिणा
कथ्थक नृत्य परीक्षेत रत्नागिरीची पूर्वा जोगळेकर प्रथम रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पटवर्धन संगीत अकादमीतर्फे गेली चार वर्षे पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील नृत्य विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात. यात कथ्थक नृत्य प्रकारात पूर्वा जोगळेकर हिने प्रथम, तर भरतनाट्यम प्रकारात मीरा खालगावकरने द्वितीय क्रमांक पटकावला.
आगाशे विद्यामंदिरात योगदिन साजरा रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी प्राणायाम व विविध आसने केली. या वेळी नगरसेविका मानसी करमरकर, पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘भाजपचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी काम करू’; रत्नागिरीचे पक्षाध्यक्ष अॅड. पटवर्धनांचा सत्कार रत्नागिरी : ‘स्नेहभावनेतून करण्यात आलेला माझा सत्कार मी कृतज्ञतापूर्वक स्वीकारतो. पुढील कार्यकाळासाठी हा प्रेरणास्रोत ठरेल. नागरी सत्कार हे मी माझे भाग्य समजतो. भाजपचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांसह काम करीन,’ असे प्रतिपादन भाजपचे रत्नागिरीचे नूतन जिल्हाध्यक्ष अॅड

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language